जिल्हाधिकारी
जिल्हा महसूल प्रशासनाचे मुख्य जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी असून ते जिल्ह्यातील इतर शासकीय विभागाचे समन्वय अधिकारी म्हणून देखील काम पहात असतात. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेक शाखा/विभाग असून अशा शाखा/विभागांवर प्रमुख म्हणून तहसिलदार/उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-याचे नियंत्रण असते.
अप्पर जिल्हाधिकारी
अप्पर जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी यांना असण्या-या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयातील काही शाखा/विभाग याच्यावर नियंत्रण ठेवत असतात.
लेखा शाखा
- कर्मचा-यांचे सेवा पुस्तक अद्यावत ठेवणे.
- स्वातंत्र्य सैनिकांसाठी निवृत्तीवेतन,वाहन भाडे सवलत,आर्थिक मदत व वैद्यकीय मदत देणे.
- कर्मचा-यांचे वैद्यकीय परतावा बील अदा करणे.
- जिल्हा कोषागार कार्यालयातील मुद्रकांची विहीत मुदतीत तपासणी करणे.
- कर्मचा-यांचे प्रवास भत्ता देयक अदा करणे.
- जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांचे लेखे अद्यावत ठेवणे.
- नैसर्गिक आपत्तीसाठी प्राप्त होणारे धनादेश शासकीय खात्यात जमा करणे.
- रजा मंजूर करणे.
- निवृत्त होणा-या कर्मचा-यांसाठी ना-देयक दाखला,विभागीय चौकशी नसलेचा दाखला देणे.
महसूल शाखा
- अकृषिक परवानगी देणे.
- महसूल विभागातील लिपीक,शिपाई यांची नेमणूक करणे.
- महसूल विभागातील लिपीक व अन्य कर्मचा-यांच्या विहीत मुदतीनंतर बदल्या करणे.
- महसूल विभागातील सर्व कर्मचा-यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे.
- वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मच्या-यांना कायमपणाचे फायदे देणे.
- पात्र वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मच्या-यांना आगाऊ वेतन वाढ मंजूर करणे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचे काम पाहणे.
- माजी सैनिक,सहकारी गृह निर्माण संस्था,शैक्षणिक संस्था व सार्वजनिक प्रयोजनासाठी शासकीय जमीन प्रदान करणे.
- नगर भूमापन क्षेत्रातील जमीनींचे नगर भुमापनाचे आदेश काढणे.
- महसूल कायद्यातील निरनिराळ्या तरतूदींची अंमलबजावणी करणे.
- शासकीय थकबाकीच्या वसूलीचा मासिक आढावा घेणे.
- पीक पाणी अहवालाचे काम करणे.
- वाड्यांचे महसूली गावात रुपांतर करणेबाबतचे काम करणे.
- अंतर्गत लेखा परिक्षण पथकाने काढलेल्या लेखा परिच्छदांचा निपटारा करणे.
- वार्षिक जमाबंदी तसेच तहसिल कार्यालयांची वार्षिक तपासणी करणे.
- तहसिल मधील सजाची पुनर्रचना करण्याचे काम करणे.
- शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे दूर/नियमबद्ध करणेबाबतची कार्यवाही करणे.
- कोर्ट ऑफ वॉर्डस चे काम करणे.
रोजगारहमी योजना शाखा
- टॅंकर व्दारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
- रोजगार हमी योजनेची कामे पुर्ण करणे.
- टंचाई क्षेत्रातील कामे करणे.
- मस्टर असिस्टंटची नेमणूक करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
- टंचाई क्षेत्रातील जनावरांसाठी चारा पुरविणे.
- रोजगार हमी योजनेची कामे करणा-या एजन्सीला अनुदान मंजूर करणे.
- रोजगार हमी योजनेमध्ये गैरप्रकार आढळून आल्यास संबंधीतांवर कार्यवाही करणे.
गृह शाखा
- जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था पाहणे.
- नैसर्गिक आपत्ती,आपत्कालीन व्यवस्थेचे काम पहाणे.
- शस्त्र परवाना देणे.
- स्वातंत्र्य सैनिक यांना आर्थिक मदत करणे.
करमणूक कर शाखा
- मुंबई करमणूक कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करणे.
- करमणूक कर,उपकराची वसुली करणे.
- सिनेमा गृह,व्हिडिओ थिएटर,डिश अॅन्टीना,व्हिडिओ गेम्स इत्यादी करमणूकींच्या माध्यमांवर नियंत्रण ठेवुन वसुली करणे.
- सर्व करमणूक कर निरिक्षक यांचेवर नियंत्रण ठेवणे.
निवडणूक शाखा
- लोकसभा,विधानसभा सार्वजनिक निवडणूकीचे काम पाहणे.
- लोकसभा,विधानसभा पोटनिवडणूकीचे काम पाहणे.
- स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम पाहणे.
- सहकारी साखर कारखाने,सहकारी बँका,दुध संघ यांच्या निवडणूकीचे काम पाहणे.
- जिल्हापरिषद,पंचायत समित्या,ग्रामपंचायत निवडणूकीचे काम पाहणे.
- मतदार यादी तयार करणे व तिचे पुनर्निरिक्षण करणे.
- मतदार याद्यांचे संगणकीकरण करणे.
- सर्व्हिस व्होटर्सची यादी तयार करणे.
- सार्वजनिक निवडणूकीसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे.
- निवडणूकीसाठी लागणारी यंत्रसामुग्री सुस्थितीत ठेवणे.
कुळकायदा शाखा
- जिल्हाधिकारी/अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे दाखल झालेल्या अपिलाचे काम पाहणे.
- फेरफार नोंदीचा आढावा घेणे.
- खाते पुस्तिका देणे.
- वतन अॅबोलीशन अक्टची अंमलबजावणी करणे.
- गावठाण विस्तार योजनेचे काम पहाणे.
खनिकर्म शाखा
- वाळू लिलावाची प्रक्रिया पार पाडणे.
- लिलावाची रक्कम वसूल करणे.
- विनापरवाना गौण खनिज उत्खननास आळा घालणे
उपविभागीय अधिकारी
- उपविभागीय अधिकारी हवेली, पिंपरी-चिंचवड
- उपविभागीय अधिकारी पुणे शहर, शिरूर
- उपविभागीय अधिकारी भोर, वेल्हा
- उपविभागीय अधिकारी बारामती, इंदापूर
- उपविभागीय अधिकारी दौंड , पुरंदर
- उपविभागीय अधिकारी मावळ, मुळशी
- उपविभागीय अधिकारी जुन्नर, आंबेगाव
- उपविभागीय अधिकारी खेड
तहसील
- तहसील पुणे शहर
- तहसील हवेली
- तहसील मावळ
- तहसील मुळशी
- तहसील बारामती
- तहसील इंदापूर
- तहसील दौंड
- तहसील जुन्नर
- तहसील आंबेगाव
- तहसील खेड
- तहसील भोर
- तहसील वेल्हा
- तहसील शिरूर
- तहसील पुरंदर