बंद

कसे पोहोचाल?

रस्त्याने

पुणे जिल्हा शेजारील शहरांशी रस्त्यांच्या जाळ्याने जोडला गेला आहे. राष्ट्रीय महामार्गांनी वेगवेगळी शहरे पुण्याशी जोडली गेली आहेत , जसे मुंबई (१४० किमी.), औरंगाबाद (२१५ किमी), विजापूर (२७५किमी). मुंबई-पुणे वाहतुकीसाठी द्रुतगती मार्ग विकसित केला आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास २-३ तासात करणे शक्य झाले आहे.

रेल्वेने

पुणे जंक्शन हे देशातील सर्व महत्वाच्या ठिकाणांना रेल्वेने जोडले गेले आहे. अनेक मेल एक्स्प्रेस , एक्स्प्रेस ट्रेन व सुपरफास्ट ट्रेन ने पुणे जिल्हा देशाच्या पूर्व,उत्तर व दक्षिण दिशांना जोडलेला आहे. पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या काही महत्वाच्या ट्रेन्स जसे डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस ३-४ तासात पुणे- मुंबई अंतर पार करतात.

हवाई मार्गे

पुणे जिल्हा हवाई मार्गाने देशातील अनेक प्रमुख शहरांशी जोडलेला आहे. पुणे शहरापासून १५ किमी. अंतरावर लोहगाव येथे पुणे विमानतळ आहे. येथून काही आंतरदेशीय उड्डाणे सुद्धा केली जातात.प्रवाशांसाठी विमानतळापासून टॅक्सी व ऑटोरिक्षा ची सोय आहे.