लोणावळा - खंडाळा
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल?:
विमानाने
जवळचे विमानतळ - पुणे
रेल्वेने
लोणावळा रेल्वे स्टेशन साठी अनेक रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. पुणे स्टेशन ते लोणावळा लोकल रेल्वे सुद्धा उपलब्ध आहे.
रस्त्याने
पुण्याहून दीड तासाचा प्रवास व मुंबईहून साधारणपणे दोन तासांचा प्रवास