सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे
सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत नवीन रस्ते, पुल व इमारतींचे बांधकाम आणि देखभाल दुरूस्ती करण्यात येते.पुणे जिल्ह्यामध्ये 1825 किमी लांबीचे राज्यमार्ग व 5023 किमी लांबीचे प्रमुख जिल्हा मार्ग आहेत. तसेच 533 लहान व मोठे पुल आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 2365 कार्यालयीन इमारती असुन त्यांचे क्षेत्रफळ 12,28,146 चौमी इतके आहे व 2787 शासकीय निवासी इमारती असुन त्यांचे क्षेत्रफळ 9,72,124 चौमी इतके आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्य अर्थसंकल्प निधी, केंद्र मार्ग निधी, नाबार्ड, हायब्रीड ॲन्युईटी मॉडेल, आशियाई विकास बँक, हुडको इ. योजनेअंतर्गत कामे करण्यात येतात.
भेट द्या - सार्वजनिक बांधकाम विभाग काम