बंद

संजय गांधी योजना शाखा

( )  राज्य  पुरस्कृत योजना

अ.क्र.

योजनेचे नाव

संजय गांधी निराधार अनुदान योजना
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना

( ) केंद्र  पुरस्कृत योजना

अ.क्र.

योजनेचे नाव

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय  विधवा निवृत्ती वेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग  निवृत्ती वेतन योजना

राज्य  पुरस्कृत योजना

अ क्र योजना सविस्तर माहिती
1 योजनेचा उददेश राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन
2 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
3 योजनेच्या प्रमुख अटी या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग ( किमान40% अपंगत्व ), क्षयरोग,पक्षघात, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग ,प्रमस्तीष्कघात, यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री , सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
4 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 1500/- प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असले तरी देखील प्रति लाभार्थी रुपये 1500/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.
5 अर्ज करण्याची पध्दत अर्जदार ‍हे संबंधित तहसिल कार्यालय /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतात. अर्जाचा नमुना व त्यासोबत जेाडवयाची आवश्यक कागदपत्रे  वेबसाइटवर देण्यात आलेली आहेत.
6 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा संजय गांधी निराधार अनुदान योजना अर्जाचा नमुना
7 संबंधित शासन निर्णय 20 August 2019 GR     व  ०५ जुलै २०२३अर्थ सहाय्य वाढ
8 अधिक माहिती साठी भेट दया  https://sjsa.maharashtra.gov.in/service/special-assistance-schemes/
9 संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय/  तहसिल कार्यालय /तलाठी कार्यालय

राज्य  पुरस्कृत योजना

अ क्र योजना सविस्तर माहिती
1 योजनेचा उददेश राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतन
2 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
3 योजनेच्या प्रमुख अटी गट (अ) :   -65  ते 79  वयोगटातील  व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून रु.1300/- प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे रु200./- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रु.1300/- प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहा असे एकूण रु.1500/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन मिळते.
    80  व 80 वर्षावरील आहे व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून रु.1000/- प्रति महिना निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे रु500./- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रु.1000/- प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रु.500/- प्रति महा असे एकूण रु.1500/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन मिळते.
गट (ब):-या योजनेतंर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- च्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये 1500/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.
4 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन रु.1500/- अदा करण्यात येते.
5 अर्ज करण्याची पध्दत अर्जदार ‍हे संबंधित तहसिल कार्यालय /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतात. अर्जाचा नमुना व त्यासोबत जेाडवयाची आवश्यक कागदपत्रे  वेबसाइटवर देण्यात आलेली आहेत.
6 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अर्जाचा नमुना
7 संबंधित शासन निर्णय 20 August 2019 GR    व ०५ जुलै २०२३अर्थ सहाय्य वाढ
8 अधिक माहिती साठी भेट दया https://sjsa.maharashtra.gov.in/service/special-assistance-schemes/
9 संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय/  तहसिल कार्यालय /तलाठी कार्यालय

केंद्र पुरस्कृत योजना

अ क्र योजना सविस्तर माहिती
1 योजनेचा उददेश राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा निवृत्तीवेतन
2 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
3 योजनेच्या प्रमुख अटी  दारिद्रयरेषे खालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ ‍निवृत्‍तीवेतन योजनेखाली (65 ते 79 वर्ष वयोगट) रुपये 200/- अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून रुपये 1300/- असे एकूण दरमहा रुपये 1500/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.
      दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ ‍निवृत्‍तीवेतन योजनेखाली (80 वर्ष व त्यापेक्षा अधिक) रुपये 500/- अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून अनुक्रमे रुपये 1000/- असे एकूण दरमहा रुपये 1500/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.
4 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.1500/- अदा करण्यात येते.
5 अर्ज करण्याची पध्दत अर्जदार ‍हे संबंधित तहसिल कार्यालय /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतात. अर्जाचा नमुना व त्यासोबत जेाडवयाची आवश्यक कागदपत्रे  वेबसाइटवर देण्यात आलेली आहेत.
6 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा संजय गांधी निराधार अनुदान योजना अर्जाचा नमुना
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अर्जाचा नमुना
7 संबंधित शासन निर्णय 20 August 2019 GR    व  ०५ जुलै २०२३अर्थ सहाय्य वाढ
8 अधिक माहिती साठी भेट दया  https://sjsa.maharashtra.gov.in/service/special-assistance-schemes/
9 संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय/  तहसिल कार्यालय /तलाठी कार्यालय

केंद्र पुरस्कृत योजना

अ क्र योजना सविस्तर माहिती
1 योजनेचा उददेश राज्यातील विधवांना दरमहा निवृत्तीवेतन
2 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील विधवांना लागू आहे.
3 योजनेच्या प्रमुख अटी दारिद्र्यरेषेखालील कुटूंबाच्या यादीतील लाभार्थ्यांकरीता केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेमधून दरमहा रु.300/- अर्थसहाय्य देण्यात येते. याच लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून दरमहा ‍ 1200/- असे एकूण दरमहा रु.1500/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.
4 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.1500/- अदा करण्यात येते.
5 अर्ज करण्याची पध्दत अर्जदार ‍हे संबंधित तहसिल कार्यालय /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतात. अर्जाचा नमुना व त्यासोबत जेाडवयाची आवश्यक कागदपत्रे  वेबसाइटवर देण्यात आलेली आहेत.
6 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा संजय गांधी निराधार अनुदान योजना अर्जाचा नमुना
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अर्जाचा नमुना
7 संबंधित शासन निर्णय 20 August 2019 GR    व  ०५ जुलै २०२३अर्थ सहाय्य वाढ
8 अधिक माहिती साठी भेट दया      https://sjsa.maharashtra.gov.in/service/special-assistance-schemes/
9 संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय/  तहसिल कार्यालय /तलाठी कार्यालय

केंद्र पुरस्कृत योजना

अ क्र योजना सविस्तर माहिती
1 योजनेचा उददेश राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दरमहा निवृत्तीवेतन
2 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील अपंगांना लागू आहे.
3 योजनेच्या प्रमुख अटी दारिद्र्यरेषेखालील कुटूंबाच्या यादीतील लाभार्थ्यांकरीता केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेमधून दरमहा रु.300/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते. याच  लाभार्थ्यांना संजय लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून दरमहा ‍ 1200/- असे एकूण दरमहा रु.1500/- प्रतिलाभार्थी अर्थसहाय्य मिळेल.
4 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.1500/- अदा करण्यात येते.
5 अर्ज करण्याची पध्दत अर्जदार ‍हे संबंधित तहसिल कार्यालय /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतात. अर्जाचा नमुना व त्यासोबत जेाडवयाची आवश्यक कागदपत्रे  वेबसाइटवर देण्यात आलेली आहेत.
6 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा संजय गांधी निराधार अनुदान योजना अर्जाचा नमुना
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अर्जाचा नमुना
7 संबंधित शासन निर्णय 20 August 2019 GR    व  ०५ जुलै २०२३अर्थ सहाय्य वाढ
8 अधिक माहिती साठी भेट दया      https://sjsa.maharashtra.gov.in/service/special-assistance-schemes/
9 संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय/  तहसिल कार्यालय /तलाठी कार्यालय

केंद्र पुरस्कृत योजना

अ क्र योजना सविस्तर माहिती
1 योजनेचा उददेश आर्थिक सहाय्य
2 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
3 योजनेच्या प्रमुख अटी दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
4 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
5 अर्ज करण्याची पध्दत अर्जदार ‍हे संबंधित तहसिल कार्यालय /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतात. अर्जाचा नमुना व त्यासोबत जेाडवयाची आवश्यक कागदपत्रे  वेबसाइटवर देण्यात आलेली आहेत.
6 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना नमुना अर्ज
7 संबंधित शासन निर्णय राष्ट्रीय कुटुंब लाभ शासन निर्णय 12-03-2013
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना शासन निर्णय 21-09-2020
8 संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय/  तहसिल कार्यालय /तलाठी कार्यालय
9 अधिक माहिती साठी भेट दया https://sjsa.maharashtra.gov.in/service/special-assistance-schemes/