अ. क्र. | योजनेचे नाव | योजनेचे निकष | लाभाचे स्वरुप | योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा |
१ | मनोधैर्य योजना | बलात्कार, लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला तसेच ज्वालाग्रही / ज्वलनशील पदार्थांव्दारे हल्ला या गुन्हयांमधील अत्याचारग्रस्त महिला व बालक, त्याचप्रमाणे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा, १९५६ नुसार पोलीस धाडीत सुटका करण्यात आलेल्या व बलात्कार / लैंगिक अत्याचाराच्या गुन्हयांमधील १८ वर्षाखालील अत्याचारग्रस्त मुली या योजनेचे लाभार्थी आहेत. | योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य व इतर सहाय्य करण्यात येते. | जिल्हा विधी सेवा प्रधिकरण, जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर, पुणे |
२ | बाल संगोपन योजना | ज्या बालकांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे, अशी बालके या योजनेची लाभार्थी आहेत. सर्वसामान्यपणे एका कुटुंबातील दोन बालकांना योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे. दोन्ही पालकांचा मृत्यु झाला असल्यास, कुटुंबातील सर्व बालकांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे. | एका बालकाला दरमहा रु. २,२५०/- वयाची १८ वर्षे पुर्ण होईपर्यंत देण्यात येतात. | नजिकचे अंगणवाडी केंद्र किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, येरवडा, पुणे. |
३ | मुख्यमंञी – माझी लाडकी बहीण योजना | महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असलेल्या २१ ते ६५ या वयोगटातील ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. २.५० लाखापेक्षा जास्त नाही, अशा महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. एका कुटूंबातील केवळ एका अविवाहित महिलेला योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे. | एका महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा रु. १,५००/- इतकी रक्कम दिली जाते. | सध्या या योजनेचे अर्ज घेणे शासनाने बंद केलेले असुन, या योजनेची अधिक माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, येरवडा, पुणे येथे मिळेल. |
४ | लेक लाडकी योजना | वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लाखा पेक्षा जास्त नसलेल्या कुटुंबात दि. १/०४/२०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या दोन मुली या योजनेच्या लाभार्थी आहेत. मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे व माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. | मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येवुन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्षे पुर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रु. १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येते. | बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय |
५ | पिंक ई रिक्षा | महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या व वार्षिक उत्पन्न रक्कम रु. ३ लाखापेक्षा जास्त नसलेल्या कुटूंबातील २० ते ४० या वयोगटातील गरजू तसेच कर्जबाजारी नसलेल्या मुली व महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. | रिक्षा खरेदी करण्यासाठी बँकाकडून ई-रिक्षा किंमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येते व किंमतीच्या २० टक्के रक्कम शासनाकडुन भरली जाते. | जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, येरवडा, पुणे. |
६ | अनाथ प्रमाणपञ | ज्या बालकांच्या वयाची १८ वर्षे पुर्ण होण्यापुर्वी त्यांच्या आई वडीलांचे निधन झाले आहे, अशी बालकांना महिला व बाल विकास विभागाकडुन अनाथ प्रमाणपञ दिले जाते. | शिक्षण व शासकीय पद भरतीमध्ये उपलब्ध पदांच्या १ टक्का इतके आरक्षण शासनाने अनाथांना लागु केले आहे. | जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, येरवडा, पुणे. |
७ | कौटुंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण कायदा, २००५ | कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला व बालके लाभार्थी आहेत. कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला व बालकांचा तक्रार अर्ज मा. न्यायालयात दाखल करण्यासाठी व त्यांना शासनाचे वकील मिळवुन देण्यासाठी मदत केली जाते. | कौटुंबिक छळापासुन संरक्षण होण्यासाठी व आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी मा. न्यायालयाकडुन आवश्यक ते आदेश घेतले जातात. | जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, येरवडा, पुणे. |
८ | कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणुक (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा, २०१३ | कामकाजाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुक झालेल्या महिला लाभार्थी आहेत. कामकाजाच्या ठिकाणी स्थापन केलेल्या अंतर्गत तक्रार समितीकडे किंवा कार्यालय प्रमुख / मालक यांच्या विरुध्द तक्रार असल्यास, जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीकडे तक्रार अर्ज दाखल करण्याचा अधिकार लाभार्थी महिलांना मिळालेला आहे. | गुन्हेगारास शिक्षा करण्याबाबत व गुन्हेगाराने लाभार्थी महिलेस नुकसानभरपाई देण्याबाबत विशाखा समिती संबंधीत कार्यालय प्रमुख / मालकांना शिफारस करते. | जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, येरवडा, पुणे. |
९ | प्रायोजकत्व व प्रतीपालकत्व (Sponcership and Fooster Care) | अनाथ किंवा निराधार बालके व अश्या बालकांची काळजी व संरक्षण करण्यास इच्छुक असलेले पती-पत्नी, हे दोन्ही लाभार्थी आहेत. संबंधीत पती-पत्नी भारतीय नागरीक असणे, दोघांचे वय ३५ वर्षाहून अधिक व ६० वर्षांपेक्षा जास्त नसणे व त्यांचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. तसेच, अश्या कुटुंबाचे एकूण किमान उत्पन्न प्रतीमाह ४५,००० असणे व कुटुंबाकडे किमान ४५० स्केअर फुट निवास व्यवस्था व इतर मुलभूत सोयी उपलब्ध असणे आवश्यक आहे. | बाल कल्याण समिती मार्फत अनाथ किंवा निराधार बालकांना त्यांच्याशी नातेसंबंध नसलेल्या कुटुंबाच्या ताब्यात १ किंवा ३ वर्षांसाठी देण्यात येते. | जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, येरवडा, पुणे. |
कार्यालय पत्ता :-
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय
पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र परिसर,
बिडी कामगार वसाहत, गोल्फ क्लब रोड,
आंबेडकर चौक जवळ, येरवडा, पुणे 411006
फोन नं – ०२०-२९९११५६८