नगरपालिका शाखा
- जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद/नगरपंचायत यांचेवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे.
- केंद्र व राज्य शासनाच्या नगरपरिषद/ नगरपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या योजनांचा वेळोवेळी आढावा घेणे.
- जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद/ नगरपंचायत यांचेकडून प्राप्त अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मान्यता देणे.
- नगरपरिषद 7 योजना, जिल्हा वार्षिक योजना, मा. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना यांची प्रशासकीय मान्यता व निधी वितरण आदेश पारित करणे.
- प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना अंतर्गत नगरपरिषदेकडून प्राप्त प्रस्तावावर कार्यवाही करणे.
- स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन करणे.
- नगरपरिषद व्यापारी संकुल व इमारती भाडे निश्चिती व मुदतवाढ बाबत कार्यवाही करणे.
- नगरपरिषद/ नगरपंचायत हद्दवाढ प्रस्तावावर कार्यवाही करणे.
- नगरपंचायत कर्मचारी समावेशन बाबत कार्यवाही करणे.
- नगरपरिषद/ नगरपंचायत सदस्य अपात्रता, अधिनियमातील तरतुदीनुसार दाखल होणारी विविध अपिले याबाबतची कार्यवाही करणे.
- केंद्रीय वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधीतून प्रशासकीय मान्यता देणे.
- राज्य संवर्ग कर्मचारी व नगरपरिषद/ नगरपंचायत कर्मचारी यांचे आस्थापना विषयक बाबी पाहणे.
- नवीन नगरपरिषद/ नगरपंचायत स्थापनेविषयी प्राप्त प्रस्ताव शासनास सादर करणे.
- दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्टीय नागरी उपजीविका अभियान(DAY-NULM) व PM स्वनिधी योजना प्रभावीपणे राबविणे.
- महानगरपलिका क्षेत्रातील मुलभूत सोई सुविधा योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देणे.