बंद

सुरक्षित इंटरनेट दिवस-२०२५

सायबर सुरक्षेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण जगभरामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सुरक्षित इंटरनेट दिवस (Safer Internet Day) साजरा केला जातो. ह्याला अनुसरून, आज मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ( NIC ) यांच्या वतीने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यशाळेस अप्पर जिल्हाधिकारी श्री. सुहास मापारी , विविध शाखांचे उपजिल्हाधिकारी , तहसीलदार व कर्मचारी उपस्थित होते. NIC च्या वतीने जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, श्रीमती अश्विनी करमरकर यांनी मार्गदर्शन केले.

आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार, सोशल मिडिया , ई-मेल व क्लाउड या सेवांच्या वाढत्या वापराबरोबरच सायबर गुन्ह्यांचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेट सुरक्षेबद्दल जागरूक राहून उपाययोजना करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सायबर गुन्हेगार निरनिराळे मार्ग शोधात आहेत. फिशिंग , data चोरी, बँकिंग फ्रौड , सोशल मिडिया account hacking, सायबर बुलीयिंग, sextortion यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

भारत सरकार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सायबर सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. Cyber crime reporting portal ( www.cybercrime.gov.in), CERT-In ( Indian Computer Emergency Response Team) आणि  Stay Safe Online ( www.staysafeonline.in) यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांना मदत केली जाते. सायबर गुन्हे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकांना आर्थिक व मानसिक त्रास देण्याचे साधन बनले आहेत. त्यामुळे सुरक्षित इंटरनेट वापरासाठी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. शासन व कायदा अंमलबजावणी यंत्रणेसोबतच सामान्य नागरिकांनीही सतर्क राहून ह्या गुन्ह्यांना आळा घालावा असे आवाहन श्रीमती करमरकर यांनी केले.

ऑनलाइन सुरक्षित रहा

 

सुरक्षित इंटरनेट दिवस च्या प्रश्नमंजुषा साठी क्यूआर कोड

Quiz