बंद

ऐतिहासिक स्थळे

आगाखान पॅलेस

आगाखान पॅलेस

गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.

सिंहगड

सिंहगड

पुर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून 25 कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युध्द झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.

लाल महाल

लाल महाल

लाल महाल हि वास्तू पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखाने उभी आहे.लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले. याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानची बोटे कापली होती.सध्याची लाल महाल हि वास्तू पुणे महानगर पालिकेनी १९८८ साली उभारली. शिवकाळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही. या वास्तूत महापालिकेने बाल शिवाजी, जिजाऊ यांचे सुंदर शिल्प उभारले आहे.

राजगड किल्ला

राजगड किल्ला

राजगड हा किल्ला पुण्यापासून सुमारे 85कि.मी. अंतरावर असलेल्या गुंजवणे गावात आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांचा खास किल्ला होता तसेच तो त्यांची पहिली राजधानी सुध्दा होता. त्यामुळे या किल्ल्याला फार मोठी ऐतिहासिक प्रसंगोचितता आहे. राजगडाला फसवा प्रवेश, नागमोडी वळणाचे अरुंद रस्ते आणि तटासारखी संरक्षण देणारी फसवी पोलादी भिंत आहे. प्रचंड पाली गेट, नेध किंवा एलिफन्ट आईज अजूनही आहेत. राजगडाच्या माथ्यावरुन सहयाद्रीच्या रांगांचे भव्य दर्शन होते.

पुरंदर व वज्रगड

पुरंदर आणि वज्रगड किल्ला

हे दोन्ही किल्ले पूरंदर तालूक्यात वसलेले असुन ते एकमेंकांना जोडलेले आहेत.काही वर्षे हा किल्ला शिवाजी महाराजांची राजधानी होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म या किल्ल्यावर 1665 साली झाला. हा किल्ला पेशव्यांची पहिली राजधानी होता.आता हा किल्ला नॅशनल कॅडेट कॉर्पोरेशन यांच्या ताब्यात आहे.

तोरणा किल्ला

तोरणा किल्ला

हा किल्ला पुण्यापासून 65कि.मी.दूर वेल्हा येथे वसलेला आहे.शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी हा पहिला किल्ला आहे.

शिवनेरी

शिवनेरी>

शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.

संभाजी महाराजांची समाधी

संभाजी महाराज समाधी

धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी पुणे_नगर महामार्गावरील वडु-बुद्रुक येथे आहे.ते कोरेगाव पासून 3-4 कि.मी.अंतरावर भिमा नदीच्या काठी आहे.

शनिवारवाडा

शनिवारवाडा

पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.