बंद

दृष्टीक्षेपात जिल्हा

वर्णन तपशील
सरासरी हवामान उन्हाळा : २२°सेल्सिअस ते ४१°सेल्सिअस हिवाळा :८ ° सेल्सिअस ते २५° सेल्सिअस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
भौगोलिक स्थान पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.
सीमा पुणे जिल्हयाच्या सीमेस उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेला सातारा जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा तसेच वायव्येला ठाणे जिल्हा आहे.
बोलीभाषा प्रामुख्याने मराठी,हिंदी, इंग्रजी. परंतु सर्व भारतीय भाषा बोलल्या जातात.
भेटीसाठी उत्तम काळ संपूर्ण वर्ष
लोकसंख्या २०११ च्या जनगणना नुसार एकूण: ९४२६२५९ पुरुष: ४९३६३६२ स्त्रिया : ४४९०५९७
नद्या भीमा, नीरा, इंद्रायणी, मुळा , मुठा, घोड , मीना, कुकडी, पुष्पावती, पवना, रामनदी
महानगरपालिका – २ पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
तालुके- १४ हवेली, पुणे शहर, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव
कॅन्टॉन्मेंट बोर्ड्स पुणे, देहूरोड, खडकी
स्थानिक वाहतूक ऑटोरिक्षा , परिवहन व खाजगी बस, भाडेतत्वावर टॅक्सी व सायकल
सिटी बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या बसेस शहराच्या प्रत्येक भागामध्ये उपलब्ध आहेत. त्या सुटण्याची प्रमुख ठिकाणे – स्वारगेट, डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन , शिवाजीनगर व पुणे महानगरपालिका.
पिनकोड ४११००१ – ४११०५३