बंद

इंटिग्रेटेड रोड ऍक्सीडेन्ट डेटाबेस (iRAD) सॉफ्टवेअर

Integrated Road Accident Database

iRAD विषयी

इंटिग्रेटेड रोड ऍक्सीडेन्ट डेटाबेस (iRAD) प्रोजेक्ट हा भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशातील रस्ते सुरक्षा वाढविण्याच्या उद्दिष्टाने सुरु केलेला प्रकल्प असून त्याला वर्ल्ड बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट हे इंटिग्रेटेड रोड ऍक्सीडेन्ट डेटाबेस (iRAD) विकसित करणे असून देशातील प्रत्येक भागातील रस्ते अपघाताचा डेटाबेस समृद्ध करणे हे आहे. प्रकल्प विश्लेषणाच्या तंत्राच्या अंमलबजावणीद्वारे देशभरात संकलित झालेल्या रस्ते अपघातांच्या डेटाचे विश्लेषण करून हा प्रकल्प विविध प्रकारची सूक्ष्मदृष्टी निर्माण करेल.

प्रस्तावित यंत्रणा मॉनिटरिंग आणि रिपोर्टिंग डॅशबोर्डद्वारे विश्लेषण आउटपुट सुलभतेने दर्शवून अ‍ॅपेक्स प्राधिकरणाला अंदाज व निर्णय घेण्याकरिता डॅशबोर्डद्वारे विश्लेषण आउटपुटचे प्रतिनिधित्व करेल. भारतातील वाढलेली रस्ते सुरक्षा म्हणजेच “सर्वांसाठी सुरक्षित रस्ते” हे या प्रकल्पाचे फलित असेल.

iRAD कशाप्रकारे कार्य करते
iRAD मोबाईल अप्लिकेशन पोलीस कर्मचाऱ्यांना रस्ता अपघाताविषयी माहिती, फोटो आणि विडिओच्या आधारे संकलित करण्यास मदत करेल ज्यानंतर त्या अपघाताचा एकमेव आईडी तयार होईल. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे किंवा स्थानिक संस्थेतील अभियंत्याच्या मोबाईलवर त्या अपघाताचा अलर्ट मिळेल. नंतर तो किंवा ती अपघात ठिकाणी भेट देईल, त्या जागेचे निरीक्षण करेल आणि आवश्यक माहिती जसे रस्त्याचे आकृतिबंध संकलित करेल. अशाप्रकारे जमा झालेल्या माहितीचे आयआयटी- मद्रास मधील एक टीम विश्लेषण करून रस्त्याच्या आकृतिबंधात आवश्यक ते बदल सुचवेल.

Stakeholders

राज्य पोलीस विभाग
पोलीस अधीक्षक, पुणे
पोलीस आयुक्त , पुणे
पोलीस आयुक्त,पिंपरी चिंचवड
राज्य वाहतूक विभाग
प्रादेशिक वाहतूक विभाग, पुणे
प्रादेशिक वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड
प्रादेशिक वाहतूक विभाग, बारामती
राज्य महामार्ग विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग
राज्य आरोग्य विभाग
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा शल्य चिकित्सक

संपर्क : helpdesk.irad@supportgov.in or irad.mh-punrm@supportgov.in