एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव ता. आंबेगाव जि. पुणे
अंतर्गत आदिवासी मुला–मुलींचे शासकीय वसतिगृह
राज्यात विभागीय , जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाद्वारे शासकीय वसतिगृह योजना कार्यान्वित आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव ता. आंबेगाव जि. पुणे या कार्यालयाच्या अधिनस्त एकुण 24 शासकीय आदिवासी मुलां- मुलींचे वसतिगृह कार्यरत आहेत.त्यापैकी मुलांची वसतिगृह संख्या- 13 व मुलींचे वसतिगृह संख्या-11 आहेत. पुणे जिल्हयात एकुण -22 वसतिगृह व सातारा जिल्हयात एकूण -02 वसतिगृह आहेत.
या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पुणे शहर हे विदयेचे माहेरघर असल्याने राज्यातील सर्व जिल्हयामधुन विदयार्थी पुणे शहर व परिसरामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात . त्यामुळे या कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी विदयार्थ्यांची मागणी वाढत आहे .
या कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या वसतिगृहातील यशस्वी विदयार्थ्यांची यशोगाथा वसतिगृह स्तरावर तयार करण्यात आलेली आहे.
अ.क्र. | स्तर/ दर्जा | वसतिगृह संख्या | मुलांचे | मुलींचे |
1 | विभागीय स्तर | 04 | 02 | 02 |
2 | जिल्हास्तर | 03 | 02 | 01 |
3 | तालुकास्तर | 07 | 04 | 03 |
4 | ग्रामीणस्तर | 10 | 05 | 05 |
एकुण | 24 | 13 | 11 |
अ.क्र. | जिल्हा | तालुका | वसतिगृह संख्या | मुलांचे | मुलींचे |
1 |
पुणे |
आंबेगाव | 06 | 03 | 03 |
2 | जुन्नर | 04 | 02 | 02 | |
3 | खेड | 04 | 02 | 02 | |
4 | वडगाव मावळ | 01 | 01 | 00 | |
5 | पुणे शहर | 07 | 04 | 03 | |
एकुण | 22 | 12 | 10 |
अ.क्र. | जिल्हा | तालुका | वसतिगृह संख्या | मुलांचे | मुलींचे |
1 | सातारा | कराड | 02 | 01 | 01 |
वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पध्दती
वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी शाळा/महाविदयालये सुरु झाल्यावर साधारणत जुन महिन्याच्या शेवटच्या आठवडयात किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु होते.
वसतिगृह ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रवेश अर्ज https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर स्विकारण्यात येत आहेत.
वसतिगृहासाठी अर्ज करताना ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा.आधार कार्ड, जात प्रमाणपत्र /जात पडताळणी प्रमाणपत्र क्रमांकासहित, चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा/महाविदयालयाचे बोनाफाईड / प्रवेश पावती, वैद्यकिय दाखला, तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक झेरॉक्स, मागील वर्षी मिळालेली गुणपत्रिका, इयत्ता 10 वी पास गुणपत्रिका/ प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला ) व इतर आवश्यक कागदपत्रे विदयार्थ्यांनी सोबत बाळगावीत.
शासकीय इमारत असलेले वसतिगृह यादी.
- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह कोरेगाव पार्क पुणे.
- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह हडपसर पुणे.
- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह पिंपरी चिंचवड पुणे
- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह घोडेगाव (कोटमदरा) ता.आंबेगाव जि.पुणे.
- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मंचर ता.आंबेगाव जि.पुणे.
- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह शिनोली ता.आंबेगाव जि.पुणे.
- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह कराड ता.कराड जि.सातारा.
- आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह सोमवार पेठ ,पुणे.
- आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह पिंपरी चिंचवड पुणे.
- आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर ता.जुन्नर जि.पुणे.
- आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह मंचर ता.आंबेगाव जि.पुणे.
- आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह शिनोली ता.आंबेगाव जि.पुणे.
भाडेतत्वावरील इमारत असलेले वसतिगृह यादी.
- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मांजरी फार्म पुणे – सदर इमारतीचे बांधकाम प्रगतीत आहे.
- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह जुन्नर ता.जुन्नर जि.पुणे – सदर इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले असून फर्निचर साहित्यासाठी निविदा स्तरावर प्रलंबित आहे.
- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह ओतुर ता.जुन्नर जि.पुणे – जमिन मिळणेकामी भुमी अभिलेख जुन्नर यांचे कार्यालयकडे प्रस्ताव प्रलंबित आहे.
- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह राजगुरुनगर ता.खेड जि.पुणे.
- आदिवासी मुलांचे वडगाव मावळ ता.मावळ जि.पुणे.
- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह डेहणे ता.खेड जि.पुणे.
- आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह हडपसर ,पुणे.
- आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह ओतुर ता.जुन्नर जि.पुणे – जमिन मिळणेकामी मा.जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला आहे
- आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह घोडेगाव ता.आंबेगाव जि.पुणे.
- आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह राजगुरुनगर ता.खेड जि.पुणे.
- आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह डेहणे ता.खेड जि.पुणे.
- आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह कराड ता.कराड जि.सातारा.
सन 2024-25 मध्ये कायमस्वरूपी नविन प्रस्तावित वसतिगृह यादी
अ.क्र | नविन प्रस्तावित वसतिगृह | वसतीगृहाची क्षमता |
1 | आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह जुन्नर ता.जुन्नर जि.पुणे. | 125 |
2 | आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर ता.जुन्नर जि.पुणे. | 125 |
3 | आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे. | 125 |
4 | आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे. | 125 |
5 | आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मंचर ता.आंबेगाव जि.पुणे. | 125 |
6 | आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह मंचर ता.आंबेगाव जि.पुणे. | 125 |
7 | आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह इंदापूर ता.इंदापुर जि.पुणे. | 125 |
8 | आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह इंदापूर ता.इंदापुर जि.पुणे. | 125 |
9 | आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह सातारा | 125 |
10 | आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह सातारा | 125 |
11 | आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह सांगली | 125 |
12 | आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह सांगली | 75 |
13 | आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह कोल्हापूर | 125 |
14 | आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह कोल्हापूर | 125 |
15 | आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह वडगाव मावळ | 75 |
एकुण | 1775 |
पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना
राज्यात विभागीय व जिल्हा स्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून आदिवासी विभागाद्वारे लागू केलेली आहे.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव ता.आंबेगाव जि.पुणे या कार्यालयाचे अधिनस्त पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या चार जिल्हयांचा समावेश आहे.
महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हा स्तरावर कार्यरत महाविदयालयांमध्ये इयत्ता 12 वी नंतर पुढे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी /विदयार्थीनी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेसाठी अर्ज करू शकतात. तसेच शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग दिनांक 27/11/2018 अन्वये सदर योजना ही तालुकास्तरावरील सर्व मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविदयालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेऊन शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विदयार्थ्यांना सदर योजना लागु झालेली आहे. अशा शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशित विद्यार्थी या योजनेमध्ये अर्ज करु शकतात.
- शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग दिनांक 16/09/2019 अन्वये तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागीय स्तर व मोठया शहरांमध्ये (महानगरांमध्ये) इयत्ता 10 वी नंतरच्या दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यवसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विदयार्थ्यांना देखील स्वयम् योजनेचा लाभ देय राहिल.
- विदयार्थ्यांनी https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे.
- स्वयम् योजनेसाठी अर्ज करताना ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, जात प्रमाणपत्र /जात पडताळणी प्रमाणपत्र क्रमांकासहित, चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा/महाविदयालयाचे बोनाफाईड / प्रवेश पावती, वैद्यकिय दाखला, तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक झेरॉक्स, मागील वर्षी मिळालेली गुणपत्रिका, इयत्ता 10 वी पास गुणपत्रिका/ प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला ) व इतर आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांनी सोबत बाळगावीत.