बंद

प्रधानमंत्री आवास योजना(शहरी) २.०

तारीख : 01/09/2024 -

केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग शासन निर्णय क्र.प्रआयो-२०२४/प्र.क्र.८७/गृनिधो-२ दि.१५ ऑक्टोबर २०२४ अन्वये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० ची अंमलबजावणी राज्यात करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणे-

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० ची ठळक वैशिष्टये:

  • “सर्वांसाठी घरे” ह्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी सदर योजनेंतर्गत सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनानार्फत अनुदान अनुज्ञेय राहील.
  • सदर योजनेंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) शौचालय व अन्य पायाभूत नागरी सुविधांसह ३० चौ.मी ते ४५ चौ. मी. पर्यंतची घरे बांधण्यात येतील.
  • सदर योजना खालील चार घटकांद्वारे कार्यान्वित केली जाईलः
      1. वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधकाम (Beneficiary Led Construction) (BLC)
      2. भागीदारी तत्वावर परवडणारी घरे | Affordable Housing in Partnership) (AHP)
      3. भाडे तत्वावर परवडणारी घरे (Affordable Rental Housing) (ARH)
      4. व्याज अनुदान योजना (Interest Subsidy Scheme) (ISS)

पात्र लाभार्थी

    1. लाभार्थी कुटुंबामध्ये , पती-पत्नी व अविवाहित मुले/मुली (Children) (वय वर्ष १८ खालील मुले/ मुली) यांचा समावेश असेल.
    2. या योजनेंतर्गत अनुदान सहाय्य प्राप्त करुन घेण्याकरीता शहरी भागात राहणाऱ्या EWS/LIG/MIG कुटुंबातील   कोणत्याही सदस्यांच्या नावावर देशाच्या कोणत्याही भागात पक्के घर नसावे.
    3. लाभार्थ्याने गेल्या २० वर्षांत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
    4. योजनेंतर्गत बांधण्यात येणारी घरे ही कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावावर असतील आणि ज्या कुटुंबात कर्ती महिला सदस्य नसेल त्या कुटुंबात कर्त्या पुरुषांच्या नावे घर राहील.

पात्र लाभाची वार्षिक उत्पत्र मर्यादा

सन २०११ च्या जनगणनेनुसार दहा लाखाहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी रुपये ६ लाख इतकी व उर्वरीत  महाराष्ट्रासाठी रु ४.५ लाख इतकी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा राहील.

 

अर्ज कसा करावा

भेट द्या : https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx

मार्गदर्शिका प्रधानमंत्री आवास योजनाशहरी २.०

अधिक माहितीसाठी:  https://pmay-urban.gov.in

 

 

लाभार्थी:

As Above

फायदे:

As Above

अर्ज कसा करावा

Visit – https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx