विशेष कार्यकारी अधिकारी म्हणुन नियुक्तीबाबत निकष :- शा.नि.02.2025 मधील परिच्छेद क्र.2
-
- संबंधित व्यक्तीचे वय विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करावयाच्या कॅलेंडर वर्षाच्या १ जानेवारी रोजी २५ वर्षापेक्षा कमी नसावे व ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- संबंधित व्यक्ती “किमान दहावी (एस.एस.सी.) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावी, आदिवासी व दुर्गम भागाकरीता “किमान आठवी परीक्षा” उत्तीर्ण असावी.
- संबंधित व्यक्तीचे महाराष्ट्रातील सलग वास्तव्य, त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करावयाच्या कॅलेंडर वर्षाच्या १ जानेवारीच्या लगतपूर्वी किमान १५ वर्षे असावे.
- संबंधित व्यक्तीला फौजदारी गुन्ह्याखाली शिक्षा झालेली नसावी किंवा त्याच्याविरुध्द गंभीर स्वरुपाचा गुन्हा नोंदविलेला नसावा किंवा कोणत्याही न्यायालयाने त्यास नादार (bankrupt) जाहीर केलेले नसावे.
विशेष कार्यकारी अधिकारी म्हणुन नियुक्तीबाबत अर्जचा नमुना
पुरस्कार प्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती :-
-
- गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार व कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार या पुरस्कारांची घोषणा झाल्यावर, त्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींपैकी, ज्या व्यक्ती वरील परिच्छेद २ मध्ये नमूद केलेले निकष पूर्ण करीत असतील, अशाच व्यक्तींची जिल्हाधिकारी यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती परस्पर करावी.
- अशा पुरस्कार प्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याविरुध्द गुन्ह्याची नोंद आढळल्यास त्यांची विशेष कार्यकारी अशा पुरस्कार प्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याविरुध्द गुन्ह्याची नोंद आढळल्यास त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून झालेली नियुक्ती रद्द करण्याची कार्यवाही देखील जिल्हाधिकारी परस्पर करतील.
- कोणत्याही न्यायालयाने त्यास शिक्षा दिल्याचे निष्पन्न झाल्यास त्याची विशेष कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ रद्द करण्यात येईल व तो पुनर्नियुक्तीस पात्र ठरणार नाही.
- वरीलप्रमाणे पुरस्कार प्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती ही त्यांच्या वयाच्या ६५ वर्षांपर्यंत चालू राहील व वयाच्या ६५ वर्षानंतर त्यांना अनर्ह ठरविण्यात यावे.
विशेष कार्यकारी अधिकारी म्हणुन नियुक्तीबाबत अर्जचा नमुना
राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीसंदर्भात निकष
-
- संबंधित गट “अ” व गट”ब” (राजपत्रित) अधिकारी नियत वयोमानानुसार निवृत्त झालेला असो अथवा स्वेच्छानिवृत्त झालेला असो, तो निवृत्ती वेतनधारक असावा.
- आ) निवृत्त झालेल्या गट “अ” व गट ब (राजपत्रित) अधिकाऱ्याविरुध्द तो शासकीय सेवेत असताना त्याच्याविरुध्द फौजदारी किंवा गंभीर बाबीसंदर्भात विभागीय चौकशीची कार्यवाही (लाचलूचपतसंबंधी प्रकरणे, गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने प्रकरणे) प्रलंबित असल्यास असा सेवानिवृत्त अधिकारी, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी अपात्र असेल.
- इ) वयाच्या ६५ वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी तो विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्यास पात्र असेल.