बंद

सारसबाग-पेशवे पार्क

ही बाग पुणे शहरात स्वारगेट जवळ आहे. बागेमध्ये हिरवेगार टवटवीत गवत आहे तसेच बागेमध्ये व्यायामासाठी असणारा पादचारी मार्ग आहे. बागेमध्ये तळयाने वेढलेली एक लहान टेकडी आहे. या टेकडीवर गणपतीचे मंदिर आहे. ही जागा ” तळयातला गणपती ” म्हणून प्रसिध्द आहे. पेशवे पार्क ही सारस बागेच्या शेजारी आहे. पुर्वी ही बाग प्राणी संग्रहालयासाठी प्रसिध्द होती. या ठिकाणी बोटींग करण्याची सोय आहे. या ठिकाणी “फुलराणी” नावाची एक छोटीशी रेल्वे आहे जी लहान मुलांना खूप आकर्षित करते.

छायाचित्र दालन

  • सारसबाग तळे
  • सारसबाग गणपती
  • सारसबागेचे दृष्य

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ - पुणे

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक - पुणे

रस्त्याने

पुणे रेल्वे स्थानकापासून ३-४ किमी अंतरावर . शहराच्या विविध भागातून बस, रिक्षा उपलब्ध आहेत.