कसबा गणपती
कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. कसबा गणपती लाल महालाजवळ असून पुण्यातील पहिला मानाचा गणपती आहे. त्यामुळे या गणपतीला गणेश उत्सव मिरवणुकीत पहिल्या मानाचे स्थान असते. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांनी गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली. दादोजी कोंडदेव यांनी त्यांचे वतीने गणपतीच्या पुतळयासमोर तंबू बांधला. आता ते पुण्यातील प्रसिध्द मंदिर आहे.