संस्कृती आणि वारसा
पुण्याची संस्कृती
पुणे ही महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे.पुण्यामध्ये मुळची मराठी संस्कृती व इतर संस्कृतीचे गुणविशेष ज्यामध्ये शिक्षण, कला, हस्तव्यवसाय, आणि नाटयशाळा यांची विशिष्टता आहे. पुण्यातील देहू ही संत तुकाराम महाराज यांची व आळंदी ही संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी आहे. महान स्वातंत्र्य सैनिक बाळ गंगाधर टिळक, आगरकर आणि गोपाळकृष्ण गोखले यांचे हे माहेरघर आहे. जयंत नारळीकर, प्रसिध्द संशोधक हे ही पुण्यातीलच आहेत. पुणे हे भारतीय शास्त्रीय संगीतासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. दर वर्षी डिसेंबर महिन्यात तीन दिवस ” सवाई गंधर्व ” हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित केला जातो.त्यासठी जगभरातून रसिक हजेरी लावतात. पुण्यामध्ये संस्कृती व वारसा यांचा आधुनिकतेशी सुरेख संगम झालेला आहे. पुणे फेस्टीवल व ओशो आंतरराष्ट्रीय आश्रमामुळे पुणे हे महाराष्ट्र राज्याचे विविध भावनांचे अधिष्ठान मानले जाते.पुण्याचा गणेशोत्सव सम्पुर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे.
खाद्य संस्कृती
पेशवेकालीन पुण्याने पारंपारिक स्वयंपाकाची पध्दत अजूनही कायम राखली आहे. पुण्याच्या खास जेवणामध्ये पुरणपोळी, आमटी, पिठलं-भाकरी, वरण-भात, मटकीची ऊसळ, थालीपीठ, आणि अळूचीवडी यांचा समावेश होतो. बाकर वडी आणि मिसळ पाव, वडा पाव हे प्रसिद्ध पुणेरी पदार्थ आहेत. तसेच गोड खाणा-यांसाठी श्रीखंड व ऋतुमानाप्रमाणे मिळणारी आमरस-पुरी या पदार्थांनी महाराष्ट्राची पारंपारिक मेजवानीची पुर्ण होते.आधुनिक काळात पुण्याने इतर आंतरराष्ट्रिय पदार्थांशी ही जसे पास्ता , पिझ्झा , चायनिज पदार्थ व अनेक कॉंटिनेंटल पदार्थ यांच्याशी मैत्री केली आहे.
सण व उत्सव
सर्व भारतीय सण उदा.दिवाळी,दसरा , जन्माष्टमी,नवरात्र,दसरा,होळी,रक्षाबंधन, नाताळ,ईद इ. सण कुठलाही धर्म,भाषा भेदभाव न मानता उत्साहाने येथे साजरे केले जातात. पुणे विशषतः गणेश उत्सवासाठी प्रसिध्द आहे.