जाहीर नोटीस
पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाने बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना सूचित करणेत येते कि, पाटबंधारे विभागाच्या विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या पात्र प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणेकामी राखीव असलेल्या जमिनींचा भूसंचय तयार करण्याचे काम सद्यस्थितीत चालू आहे.सदरील भूसंचय वेळोवेळी अद्यावत केला जाईल.त्यानुसार पुणे जिल्ह्यातील त्या त्या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पुनर्वसनासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी प्रपत्र – अ, जिल्हाधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन (जमीन) पुणे यांचे नावे असलेल्या शासकीय जमिनी प्रपत्र – ब व संपादित न केलेल्या परंतु ७/१२ च्या इतर हक्कात पुनर्वसनाचा शेरा असलेल्या जमिनी प्रपत्र – क, अशा तीन प्रकारच्या जमिनींच्या अनुषंगाने सद्यस्थितीत प्राप्त माहितीनुसार तयार करण्यात आलेल्या भूसंचयाबाबतची माहिती जिल्हाधिकारी पुणे यांच्या www.pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.सर्व पाटबंधारे प्रकल्पाने बाधित झालेल्या पर्यायी जमीन मिळण्यासाठी पात्र प्रकल्पग्रस्तांना विनंती आहे की, त्यांनी वर उल्लेखित संकेतस्थळावर भूसंचयामध्ये उपलब्ध जमिनीचा तपशील अभ्यास करून पर्यायी जमिनीबाबत अर्ज दाखल करावा.जर भूसंचयातील पूर्ण माहिती भरलेल्या जमिनींपैकी ज्या जमिनीसाठी ६ महिन्यांत पसंती प्राप्त होणार नाही,अशा जमिनी भूसंचयामधून वगळण्याची कार्यवाही करण्यात येईल. जिल्हाधिकारी तथा |