image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English


image here
image here
image here
image here
image here
पुण्याचे दळणवळण
पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्हयांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्हयामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्हयातील मुख्य ठिकाणावरुन हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.

रस्त्यांचे जाळे

पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकुण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकुण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकुण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकुण लांबी 6,555 कि.मी. आहे.

राष्ट्रीय महामार्ग

राष्ट्रीय महामार्ग नं.4 (मुंबई-बंगलोर) - राष्ट्रीय महामार्ग नं.4 हा मार्ग खंडाळा, लोणावळा, तळेगाव, चिंचवड, पुणे व खेड शिवापूर या शहरा मधून जातो. हा महामार्ग रायगड जिल्हयातून पुणे जिल्हयात प्रवेश करतो व सातारा जिल्हयापाशी संपतो. पुणे जिल्हयातील त्याची एकुण लांबी 120 कि.मी. आहे. राष्ट्रीय महामार्ग नं.9 (पुणे-सोलापूर-हैदराबाद) - राष्ट्रीय महामार्ग नं. 9 या महामार्गाची सुरुवात पुणे जिल्हयातून होत असून तो लोणी, भिगवण व इंदापूर मार्गे सोलापूर जिल्हयात प्रवेश करतो. या महामार्गाची एकुण लांबी 152 कि.मी. आहे. राष्ट्रीय महामार्ग नं. 50 (पुणे- नाशिक) - राष्ट्रीय महामार्ग नं.50 या महामार्गाची सुरुवात पुणे शहरात होत असून हा मार्ग चाकण राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव व एलेफंटा मार्गे नाशिक जिल्हयात प्रवेश करतो. या महामार्गाची एकुण लांबी 95 कि.मी. आहे.

रेल्वे मार्ग

ब्रॉड गेज दुहेरी व एकेरी रेल्वे मार्गाची पुणे जिल्हयातील एकुण लांबी 311 कि.मी. आहे. यातील एकेरी रेल्वे मार्गाची लांबी 162कि.मी. तर दुहेरी रेल्वे मार्गाची लांबी 149 कि. मी. आहे. पुणे जिल्हयात पुणे व दौंड हे दोन रेल्वे जंक्शन आहेत. मुंबई-पुणे-सोलापूर, पुणे-मिरज व दौंड बारामती हे तीन महत्वाचे रेल्वे मार्ग या जिल्हयातून जातात. पुणे शहर देशातील इतर सर्व प्रमुख शहरांशी रेल्वेने जोडलेले आहे.

हवाई मार्ग

पुणे आपल्या देशातील सर्व ठिकाणांशी स्वदेशी हवाई मार्गाने जोडले गेले आहे. लोहगाव येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे आणि या विमानतळावरून आपल्या देशातील व आंतरराष्ट्रीय वाहतूक सुध्दा होते. याशिवाय आता जिल्हयातील खेड तालुक्या जवळ आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहू केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.


image here image here image here image here image here image here image here image here image here image here