image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English


image here

सहलीची ठिकाणे...

कात्रज सर्पोद्यान

नावाप्रमाणेच या उद्यानामध्ये साप, सरपटणारे प्राणी, पक्षी, कासवे यांचा संग्रह आहे. येथे सापाच्या 160 प्रजाती आहेत. श्री. निलमकुमार खैरे यांनी सन 1986 मध्ये या उद्यानाची स्थापना केली. त्यानंतर हे उद्यान सन 1999 मध्ये राजीव गांधी उद्यानामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यात आता प्राणीसंग्रहालयाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. हे उद्यान पुण्यापासून 8 कि.मी. अंतरावर पुणे-सातारा रोडवर भारती विद्यापीठाजवळ आहे.

...

संभाजी पार्क

पुणे शहरातील डेक्कन जिमखान्या जवळ बालगंधर्व रंगमंदिराला लागून असलेली ही एक पुण्यातील अतिशय सुंदर बाग आहे. मत्सालय व छोटासा किल्ला हे या बागेतील प्रमुख आकर्षण आहे. विविध प्रकारची झाडे, फुले, ताजे हिरवेगार गवत व कारंजी या उद्यानाच्या सौंदर्यात भर टाकतात.

...

अप्पूघर/इंदिरा गांधी उद्यान

अप्पू घर हे निगडी पासून 2 कि.मी. व पुणे शहरापासून 22 कि.मी. अंतरावर आहे. हे दिल्लीच्या अप्पूघरासारखेच आहे. तेथे असलेले असंख्य खेळ, गंमती व बागडण्यासाठी पर्यटक आतुरतेने वाट पहात असतात. अप्पू घरात वॉटरपार्कची सोय सुध्दा आहे. असंख्य खेळांमध्ये लहान मुले रमून जातात तर तेथे असणारे सुन्दर थंडगार तळे, दुर्गामातेचे मंदिर व फिरण्याकरिता मोठया टेकडया सर्व पिढीतील लोकांना आकर्षित करतात.

...

पेशवे पार्क

ही बाग पुणे शहरात स्वारगेट जवळ आहे. बागेमध्ये हिरवेगार टवटवीत गवत आहे तसेच बागेमध्ये व्यायामासाठी असणारा पादचारी मार्ग आहे. बागेमध्ये तळयाने वेढलेली एक लहान टेकडी आहे. या टेकडीवर गणपतीचे मंदिर आहे. ही जागा " तळयातला गणपती " म्हणून प्रसिध्द आहे. पेशवे पार्क ही सारस बागेच्या शेजारी आहे. पुर्वी ही बाग प्राणी संग्रहालयासाठी प्रसिध्द होती. या ठिकाणी बोटींग करण्याची सोय आहे. या ठिकाणी "फुलराणी" नावाची एक छोटीशी रेल्वे आहे जी लहान मुलांना खूप आकर्षित करते.

...

लोणावळा/खंडाळा

लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.

...

खडकवासला धरण

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे हे प्रमुख धरण आहे.पुण्यापासून १५ किमी. अंतरावर असणाऱ्या ह्या धरणाला पुण्याची चौपाटी असेही म्हणतात. सिंहगड किल्ल्याच्या रस्तावरच असणारे हे ठिकाण सहलीसाठी उत्तम आहे.