image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English


image here

अल्पबचत शाखा


अल्पबचत संचालनालय

केंद्रिय नियोजन आयोगाने शिफारस केल्यानुसार मुंबई राज्याने दिनांक 03/01/1957 रोजी अल्पबचत संचालनालयाची स्थापना केली. जनतेत काटकसर व बचतीची सवय वाढविणे तसेच वाचविलेली रक्कम योग्य प्रकाराने गुंतवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, व त्याआधारे अल्पबचत योजनेतील ठेवीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुक मिळवण्यासाठी राज्यशासनाकडुन अल्पबचत एजंटाची नेमणुक करण्यात येत होती. अल्पबचत योजनांची प्रसिध्दी विविध माध्यमातुन राज्य स्तरावरुन तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उप/ सहायक संचालक अल्पबचत यांच्याकडुन केली जात होती. तथापि, अल्पबचत संचालनालयाने नवीन एजन्सी देणे दिनांक 01/12/2005 पासुन बंद केले आहे. सद:स्थितीमध्ये अल्पबचत संचालनालयामार्फत खालील तीन एजंन्सीच्या नुतनीकरणाचे कामकाज करण्यात येते.

  • अल्पबचत अधिकृत एजंसी
  • महिला प्रधान क्षेत्रिय बचत योजना एजंसी
  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना एजंसी

कार्यालयाची कार्य व कर्तव्ये

  • अल्पबचत योजनांचा प्रचार व प्रसार करणे, अल्पबचत /महिला प्रधान क्षेत्रिय बचत योजना, पी. पी. एफ. अभिकर्ते यांचे एजंन्सीचे नुतनीकरण (दर तीन वर्षांसाठी), एजंन्सी रदद करणे व नियंत्रण करणे.
  • अनुकंपा तत्त्चावर महिला प्रधान क्षेत्रिय बचत योजना, पी. पी. एफ. अभिकर्ते यांचे प्रस्तावाची तपासणी व शिफारस करणे.
  • महिला प्रधान/ अल्पबचत / पीपीएफ अभिकर्ते व पोस्ट ऑफीस यांच्याशी समन्वय साधुन तक्रारीचे निरसन करणे.
  • बचत प्रमाणपत्र तारण करुन घेणे व तारण मुक्त करणे.
  • जिल्हयांअंतर्गत असलेल्या मुख्य पोस्ट कार्यालयाकडुन प्रत्येक महिन्याच्या गुंतवणुकीबाबत तपशिल मिळवणे व अल्पबचत संचालनालयाला सादर करणे.
कार्यालयाची रचना
एजन्सी नुतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे

अल्पबचत अधिकृत एजंन्सी महिलाप्रधान क्षेत्रिय बचत योजना एजंन्सी सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजना एजंन्सी
रुपये 2,000/-चे राष्ट्रीय बचतपत्र रुपये 1,000/-चे राष्ट्रीय बचतपत्र रुपये 2,000/-चे राष्ट्रीय बचतपत्र
दोन जामिनदार व त्यांचे हमीपत्र दोन जामिनदार व त्यांचे हमीपत्र दोन जामिनदार व त्यांचे हमीपत्र
करारनामा करारनामा करारनामा
पोलिस वर्तवणुकीचा दाखला(चारित्र्यपडताळणी) पोलिस वर्तवणुकीचा दाखला(चारित्र्यपडताळणी) पोलिस वर्तवणुकीचा दाखला(चारित्र्यपडताळणी)
3 वर्षात 15 लाखाची गुंतवणुक होणे आवश्यक ग्रामीण भागात वार्षिक1 लाख गुंतवणुक होणे आवश्यक ग्रामीण भागात 50 खाती व 5000/-रुपयांचा भरणा तसेच शहरी भागात 100 खाती व 10000/-रुपये गुंतवणुक होणे आवश्यक 3वर्षात 30 नवीन पीपीएफ खाती होणे आवश्यक
नूतनीकरण अर्ज नूतनीकरण अर्ज नूतनीकरण अर्ज
रद्द अर्ज रद्द अर्ज रद्द अर्ज
महत्वाचे शासन निर्णय

अ.क्र. विषय शासननिर्णय व दिनांक
नवीन एजन्सी देणे व बंद करण्याबाबत वित्त विभाग क्र.अ.ब.वि-1100/प्रक्र617/05/विकास,दि.01/12/2005
अनुकंपा तत्त्वावर एजंटाच्या मृत्युमुळे आजारपणामुळे/वृध्दापकाळामुळे व स्थलांतरामुळे वित्त विभाग क्र.अ.ब.वि-1100/प्रक्र617/05/विकास,दि.26/08/2008
महिलाप्रधान क्षेत्रिय बचत योजना/अल्पबचत अधिकृत अभिकर्ते नेमणुक/नुतनीकरण व रदद करणेबाबत वित्त विभाग क्र.अ.ब.वि-1100/प्रक्र617/05/विकास,दि.30/05/2009
एजन्सी विलंबाने नुतनीकरण करणे बाबत वित्त विभाग क्र.अ.ब.वि-1100/प्रक्र617/07/
अल्पबचत अभिकर्ते नेमणुक / नुतनीकरण व रदद करणेबाबत वित्त विभाग क्र. अ.ब.वि/ प्रक्र617/अब (विकास), दि.30/05/2009
महिलाप्रधान अभिकर्ते नेमणुक / नुतनीकरण व रदद करणेबाबत वित्त विभाग क्र. अ.ब.वि/ प्रक्र617/अब (विकास), दि.30/05/2009
शासन निर्णय

कार्यालयीन संपर्क

सहायक संचालक अल्पबचत,
अल्पबचत शाखा पुणे
जुनी जिल्हा परिषद इमारत, तिसरा मजला,
पुणे-411001