image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English


image here

गृह शाखा


गृह शाखेविषयी

गृहशाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे हे कार्यालय हे जिल्हास्तरावरील कायदा व सुव्यवस्था राखणे, नवीन शस्त्रपरवाना मंजुर करणे, आपत्ती व्यवस्थापन नियोजन, विशेष कार्यकारी अधिकारी पदनियुक्ती, शेतकरी आत्महत्या, मृतबंदी दंडाधिकारीय चौकशी, स्वातंत्र्य सैनिक प्रमाणपत्र, बॅक सेक्युरीटायझेशन, इव्हिक्शन, विविध शासकीय सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी, स्फोटक परवाने नुतणीकरण व नाहरकत प्रमाणपत्र देणेबाबत चे कामकाज करणारे कार्यालय असून ते प्रत्यक्षरित्या जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचे नियंत्रणाखाली आहे.

  • जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था पाहणे.
  • नैसर्गिक आपत्ती,आपत्कालीन व्यवस्थेचे काम पहाणे.
  • शस्त्र परवाना देणे.
  • स्वातंत्र्य सैनिक यांना आर्थिक मदत करणे.
  • Character Verification
अनु. क्र. परवाना / नाहरकत दाखला प्रकार आवश्यक विहित अर्ज व फॉर्म प्रकार शस्त्र अधिनियम व नियम
नवीन शस्त्र परवाना अे शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम-13
सैन्यदल/पोलीस विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना नवीन शस्त्र परवाना बी शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम-13
बँकेसाठी नवीन शस्त्र परवाना सी शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम-13
शस्त्र परवाना नुतनीकरण अर्ज डी शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम-15
सेल परमिशन शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम-5(2)(ए)(बी)
बँकेसाठी नवीन शस्त्र परवाना सी शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम-13
शस्त्र परवान्यामध्ये खरेदी केलेल्या शस्त्राची नोंद करणे एफ शस्त्र नियम 1962 मधील कलम-52(2)
शस्त्र परवान्यामधून शस्त्राची नोंद कमी करणे जी शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम-5(2)(ए)(बी)
जर्नी लायसन्स, प्रवासी परवाना एच शस्त्र अधिनियम 1959, नियम 1962 मधील कलम-3
१० शस्त्र परवाना रजिस्ट्रेशन आय शस्त्र नियम 1962 मधील नियम क्र. 62(4)
११ शस्त्र व दारुगोळा इतर राज्यात घेवून जाणेसाठी ना-हरकत पत्र जे शस्त्र नियम 1962 मधील कलम 50 (2)
१२ वेपन रिलीज ऑर्डर के शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम-21
१३ रिटेनर नोंदीबाबत (बँक) एल शस्त्र नियम 1962 मधील नियम क्र. 13
१४ डूप्लीकेट परवाना मिळणेबाबत. एम शस्त्र नियम 1962 मधील नियम क्र. 58
१५ रिटेनर नोंदीबाबत (नागरिकांसाठी) एन शस्त्र नियम 1962 मधील नियम क्र. 13
१६ 16. शस्त्रपरवान्याचे कार्यक्षेत्र वाढविणे
१७ शस्त्रखरेदी मुदतवाढ मिळणे पी शस्त्र नियम 1962 मधील नियम 52(2)
१८ अतिरीक्त शस्त्र मंजूर करणे क्यू शस्त्र नियम 1962 मधील नियम 123
अनु. क्र. परवाना / नाहरकत दाखला प्रकार आवश्यक विहित अर्ज व फॉर्म प्रकार डाऊनलोड
नवीन शस्त्र परवाना / New Arm Licence अे download
सैन्यदल/पोलीस विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना नवीन शस्त्र परवाना/New Arm Licence for Military / Police Officers / men बी download
बँकेसाठी नवीन शस्त्र परवाना/New Arm Licence for Bank सी download
शस्त्र परवाना नुतनीकरण अर्ज / Renewal of Arm Licence डी download
सेल परमिशन /Sale Permission download
शस्त्र परवान्यामध्ये खरेदी केलेल्या शस्त्राची नोंद करणे/Weapon Insert Entry on Arm Licence एफ download
शस्त्र परवान्यामधून शस्त्राची नोंद कमी करणे/Weapone delete Entry on Arm Licence जी download
जर्नी लायसन्स, प्रवासी परवाना /Journey Licence एच download
शस्त्र परवाना रजिस्ट्रेशन /Journey Licence आय download
१० शस्त्र व दारुगोळा इतर राज्यात घेवून जाणेसाठी ना-हरकत पत्र / Arm/Ammunation – other state transport N.O.C. जे download
११ वेपन रिलीज ऑर्डर /Weapon release Order के download
१२ रिटेनर नोंदीबाबत (बँक) / Retainer Registration (Bank) एल download
१३ डूप्लीकेट परवाना मिळणेबाबत/ Application for Duplicate Licence एम download
१४ रिटेनर नोंदीबाबत (नागरिकांसाठी)/Retainer Registration (Public) एन download
१५ 16. शस्त्रपरवान्याचे कार्यक्षेत्र वाढविणे /Area Extention of Licence download
१६ शस्त्रखरेदी मुदतवाढ मिळणे/Purchase Period for weapon पी download
अनु. क्र. परवाना / नाहरकत दाखला प्रकार निर्णयअधिकारी
स्वसंरक्षणार्थ नवीन रिव्हॉल्वर/पिस्तोल शस्त्रपरवाना मा.जिल्हादंडाधिकारी,पुणे
स्वसंरक्षणार्थ नवीन बंदूक/रायफल शस्त्रपरवाना मा.अपरजिल्हादंडाधिकारी,पुणे
पिकसंरक्षणार्थ नवीन बंदूक/रायफल शस्त्रपरवाना संबंधित तालुक्याचे तालुका कार्यकारीदंडाधिकारी
रिव्हॉल्वर/पिस्तोल शस्त्रपरवान्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्यापुरते वाढविणे मा.जिल्हादंडाधिकारी,पुणे
बंदूक/रायफल शस्त्रपरवान्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्यापुरते वाढविणे मा.अपरजिल्हादंडाधिकारी,पुणे
शस्त्र परवाना नुतनीकरण संबंधितउपविभागीयदंडाधिकारी
प्रवासामध्ये शस्त्र बाळगणेस प्रवासी परवाना देणे मा.अपरजिल्हादंडाधिकारी,पुणे
रिव्हॉल्वर/पिस्तोल शस्त्रविक्री परवानागी देणे मा.जिल्हादंडाधिकारी,पुणे
बंदूक/रायफल शस्त्रविक्री परवानगी देणे मा.अपरजिल्हादंडाधिकारी,पुणे
१० शस्त्रपरवान्यामध्ये खरेदी केलेल्या शस्त्राची नोंद करणे मा.अपरजिल्हादंडाधिकारी,पुणे
११ शस्त्रपरवान्यामधून शस्त्राची नोंद कमी करणे मा.अपरजिल्हादंडाधिकारी,पुणे
१२ जर्नी लायसन्स,प्रवासी परवाना मा.अपरजिल्हादंडाधिकारी,पुणे
१३ रिव्हॉल्वर/पिस्तोल शस्त्रपरवाना रजिस्ट्रेशन मा.जिल्हादंडाधिकारी,पुणे
१४ बंदूक/रायफलशस्त्रपरवानारजिस्ट्रेशन मा.अपरजिल्हादंडाधिकारी,पुणे
१५ शस्त्र व दारुगोळा इतर राज्यात घेवून जाणेसाठी ना-हरकतपत्र मा.अपरजिल्हादंडाधिकारी,पुणे
१६ रिव्हॉल्वर/पिस्तोल शस्त्रमुक्ती आदेश मा.जिल्हादंडाधिकारी,पुणे
१७ बंदूक/रायफल शस्त्रमुक्ती आदेश मा.अपरजिल्हादंडाधिकारी,पुणे
१८ रिटेनरनोंदीबाबत मा.अपरजिल्हादंडाधिकारी,पुणे
१९ रिव्हॉल्वर/पिस्तोल शस्त्र परवान्याची दुबार प्रत देणे. मा.जिल्हादंडाधिकारी,पुणे
२० बंदूक/रायफल शस्त्र परवान्याची दुबार प्रत देणे. मा.अपरजिल्हादंडाधिकारी,पुणे
२१ शस्त्र खरेदी करण्यास कालावधी वाढवून मिळणेबाबत(पर्चेसपिरियड) मा.अपरजिल्हादंडाधिकारी,पुणे
स्वातंत्र्य सैनिकांची यादी 2017

पुणे जिल्ह्यातील विविध यात्रा

स्फोटक कायदा २००८ अंतर्गत परवाने

स्फोटक कायदा २००८ अंतर्गत अर्जांचे नमुने

नैसर्गिक आपत्ती अंतर्गत करणेत येणारे कामकाज

राज्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटनामध्ये बाधित होणा-या व्यक्तीना मदत देण्याकरिता राज्य शासना तर्फे मदत दिली जाते. यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी शासन निर्णय पारीत केले आहेत. केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे (हिमवर्षात), टोळधाड, दुष्काळ, ढगफुटी व कडाक्याची थंडी या आपत्तीचा समावेश केला आहे. सदर आपत्तीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत अनुज्ञेय आहे. सदर मदतीचे दर राज्य शासनामार्फत घोषित केलेल्या अवेळी पाऊस, अतिवृष्टी (शेतीपिकांच्या नुकसानीसह सर्व नुकसान), आकस्मिक आग, समुद्राचे उधान, वीज कोसळणे या आपत्तीकरिताही लागू करण्यात येतात. या कार्यालयाकडून खालील प्रमाणे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कामकाज केले जाते.

1. नैसर्गिक आपत्तीअंतर्गत घडणा-या घटनांची माहिती शासनास सादर करणे.
2. नैसर्गिक आपत्तीतील बाधितांना शासन निर्णयाप्रमाणे मदत देणे.
3. उत्तराखंड दुर्घटना, माळीण दुर्घटना या सारखे अचानक उदभवणा-या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जखमी / मयत व्यक्तीना मदत, अत्यविधीची सोय करणे, अन्न धान्याची सोय करणे,
इतर निधीची सोय करणे
संबंधित शासन निर्णय

दहशतवाद अथवा जातीय दंगलीतील बाधितांसाठी राज्य शासन व केंद्रीय सहाय्य योजना बाबत माहिती.

राज्य शासनाची योजना

दहशतवाद अथवा जातीय दंगलीतील तसेच बाँम्बस्फोटातील बाधितांसाठी महसूल व वन विभाग यांचेकडीलशासन निर्णय क्र.आरएलएफ-11-03/प्रा.क्र.310/म-3, दिनांक. 24 ऑगस्ट 2004दि. 01 डिसेंबर 2008 अन्वये राज्य शासनाची मदत अदा करणेत येते. त्यासाठी बाधितांनी वा मयत व्यक्तींच्या वारसांनी जिल्हादंडाधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. तद्नंतर पोलीसामार्फत तसेच संबंधित तहसिलदारामांर्फत चौकशी करुन राज्य शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करणेत येतो. अनुदान प्राप्त झालेनंतर संबंधित उपविभागीय अधिकारी / तहसिलदार यांचेमार्फत बाधितांना मदत अदा करणेची कार्यवाही केली जाते.

केंद्रीय सहाय्य योजना

केद्रीय गृह विभाग, भारत सरकार यांचे कडील पत्र क्रमांक आय -12020/42/2008 एनसीबी, दिनांक 3 जून 200829 जून 2012 चे अर्धशासकीय पत्रानुसार बाधितांना अुनदान वाटप करणेचे निर्देश देणेत आलेले आहेत. सदर योजनेंतर्गत मदत मिळणेसाठी बाधितांनी संबंधित जिल्हादंडाधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. u सदर योजने अंतर्गत बाधितांना मदत वाटप करणेकामी मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय समिती गठीत करणेचे निर्देश उक्त नमूद केंद्र शासनाकडील निर्णयानुसार देणेत आलेले आहेत. सदर समितीत पात्र झालेले प्रस्ताव राज्य शासनास सादर करणेत येतात. राज्य शासनाकडून बाधितांच्या नावे धनादेश प्राप्त झालेनंतर सदरचे धनादेश संबंधित तहसिलदारामार्फत बाधितांना वा मयतांचे वारसांना अदा करणेत येतात. बाधितांनी प्रस्ताव सादर करणेकामी करावयाच्या अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे.