image here

COLLECTOR OFFICE, PUNE

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

image here

वेबसाईट नकाशा | English


image here

अन्नधान्य वितरण शाखा

अन्नधान्य वितरण शाखा

अन्नसधान्यण वितरण अधिकारी कार्यालय, पुणे यांचे कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुणे शहर व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील एकूण आठ परिमंडल्‍ विभागीय कार्यालयांचा समावेश होतो. सदर परिमंडल कार्यालयांमध्येम शिधापत्रिकाधारकांना विविध योजनांचे धान्य स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मुदतीत पुरविणेचे कामकाज प्रथम प्राधान्याने करणेत येते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अधिकृत शिधावाटप / रास्तभाव दुकानांतून जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवणेचे प्रमुख कार्य अन्नेधान्यध वितरण अधिकारी यांचेमार्फत करणेत येते. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचे विभागामार्फत देणेत येणा-या आदेशाप्रमाणे व या विभागामार्फत ठरवून दिलेल्या कालमर्यादा यांचे पालन करणेची जबाबदारी हे कार्यालय व त्यातील संरचनेतील अधिकारी/कर्मचारी यांचे साखळीमार्फत जनतेला विहित केलेल्या कालमर्यादेत सेवा पुरविण्याची जबाबदारी पार पाडत असते. या कार्यालयामध्ये प्रशासनाने सुधारण्याच्या प्रक्रियेच्या पारदर्शकता व प्रतिसादशीलता या तत्वाच्या पार्श्वेभूमीवर “ नागरीकांची सनद ” प्रसिद्ध करणेत आली आहे. पुणे शहर व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील जनतेला सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतंर्गत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा वाजवी दरात करणे, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण वेळीच करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

कार्यालयाची कार्य व कर्तव्ये

1. जिल्हा स्तर :- जिल्हाधिकारी, पुणे यांचे नियंत्रणाखाली अन्नशधान्यर वितरण अधिकारी कार्यालयाचे कामकाज जिल्हा पुरवठा अधिकारी व त्याचे अधिपत्याखालील अधिकारी / कर्मचारी हे पुणे शहर व पिंपरी चिंचवडमहानगरपालिका क्षेत्रातील पुरवठा विषयक कामकाजावर नियंत्रण ठेवून एकत्रित अहवाल शासनास सादर करणेचे कामकाज तसेच शासन व तालुक्यातील कामकाजाबाबत समन्वय साधणेचे कामकाज केले जाते.

2. परिमंडल स्तर :- नायब तहसिलदार तथा परिमंडल अधिकारी हे त्यांचे नियंत्रणाखाली पुरवठा विभागाचे पुरवठा विषयक कामकाजावर नियंत्रण ठेवणेचे काम करतात.

3. स्वस्तधान्य परवाना नुतणीकरण करणे :- स्वस्तधान्य परवना देणे व नुतणीकरण करणेचे अधिकार विहित केलेल्या कालावधीत परवाना धारकाने परवाना नुतनीकरण फी चलनाने भरलेली असलेस अन्नवधान्यी वितरण अधिकारी यांना देणेत आले आहेत.

4. नवीन केरोसीन परवाना देणे व नुतनीकरण करणे :- किरकोळ केरोसीन परवना देणे व नुतनीकरण करणेचे अधिकार अन्न धान्यी वितरण अधिकारी यांना आहेत. सदर परवाना नुतनीकरण करणेसाठी विहित केलेल्यार कालावधीत परवाना धारकाने परवाना नुतनीकरण फी चलनाने भरलेली असलेस अन्नरधान्य वितरण अधिकारी यांचेमार्फत परवाना देणेत येतो.

जीवनावश्यक वस्तूंची अनुज्ञेयता

शिधावस्तुचे नांव परिमाण
गहू पिवळ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबे 1) अंत्योदय - दरमहा 20 किलो धान्य गहू रूपये 2 प्रति किलो. 2) बिगर अंत्योदय - दरमहा गहू 20 किलो रूपये 5 प्रति किलो या दराने
तांदूळ 1) अंत्योदय - दरमहा 15 किलो धान्य तांदूळ रूपये 3 या दराने. 2) बिगर अंत्योदय दरमहा 15 किलो तांदूळ रूपये 6 या दराने याकामी अन्न सुरक्षा कायदा 2013 अंमलात आलेला असून सदर कायद्याची अंमलबजावणी दि. 1 फेब्रुवारी 2014 पासून सुरू झालेली आहे. केशरी शिधापत्रिका कुटुंबाना दरमहा 35 किलो धान्य, गहू व तांदूळ मिळून गहू रूपये 7.20 प्रति किलो या दराने व तांदूळ रूपये 9.30 या दराने देणेत येते शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबे धान्य पुरवठयातून वगळण्यात आली आहे
साखर दरमहा दर माणसी 500 ग्रॅम प्रति किलो रू. 13.50 या दरने *केशरी व शुभ्र शिधापत्रिकाधारकांना साखर वितरित करण्यात येत नाही.
चनाडाळ/तुरडाळ दरमहा प्रतिकार्ड 1 किलोग्रॅम प्रति किलो रू. 55.00 या दराने
खाद्यतेल दरमहा प्रतिकार्ड 1 लिटर रू. 30.00 या दराने.

दरमहा 7 तारखेस अन्न दिवस साजरा करणेत येतो. सदर दिवशी सर्व केंद्रीय अन्नपुर्णा योजनेच्या लाभार्थ्यांना धान्य वाटप करणेत येते.

दिनांक 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा कण्यात येतो.

दिनांक 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो.

नागरिकांची सनद
आधार डेटा एन्ट्री रिपोर्ट मार्च २०१६
धान्य नियतन जानेवारी २०१६
झोन निहाय नियतन जानेवारी २०१६
गॅस सिलिंडर अनुदान समर्पित करणे
प्रेस नोट